

स्वार्कच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त ‘wisdom window’ ही मालिका youtube या माध्यमाद्वारे प्रसारित केली. या मालिकेमध्ये विविध क्षेत्रांमधील दिग्गजांनी त्याचं क्षेत्र आणि शिक्षण यामधला संबंध याबाबतीत आपले विचार व्यक्त केले. ज्ञानरचनावाद, नवे शैक्षणिक धोरण, नृत्य, भाषाशिक्षण, मानसशास्त्र हे विषय ‘शिकणं’ या प्रक्रियेमध्ये काय भूमिका निभावतात याविषयी या मालिकेमध्ये संवाद साधला गेला आहे.
विसडम विंडो
संवादक
आदिती नातू
जेष्ठ शिक्षणतज्ञ आणि शैक्षणिक सल्लागार
नवे शैक्षणिक धोरण आणि ज्ञानरचनावाद
प्रत्यक्ष कृतीशील शिक्षण, अनुभव, प्रयोग, मूलकेंद्रित विचार, तणावमुक्त वातावरण यासारखी तत्त्वे ज्ञानरचानावादाचा गाभा आहेत. नवे शैक्षणिक धोरण प्रत्यक्षात राबवण्यासाठी ‘ज्ञानरचनावाद’ कसा महत्वाचा आहे याविषयी या भागात आदिती ताईनी संवाद साधला आहे.
संवादक
सायली वझे
चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ (clinical psychologist)
शिक्षण आणि मानसिक स्वास्थ्य
मुलाचं मानसिक स्वास्थ्य त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडतं. हे मानसिक स्वास्थ्य कसं जपावं, सर्वसाधारणपणे मुलांना कोणत्या समस्या जाणवतात आणि त्याचं नि वारण कसं करता येतं याबाबतीत सायली ताईनी खूप सोप्प्या शब्दात या भागात समजावून सांगितलं आहे.
संवादक
वैभव आरेकर
ख्यातनाम भरतनाट्यम कलाकार
शिक्षण आणि नृत्य
नृत्य, नाट्य, संगीत, ललित कला हे कलाप्रकार नेहमीच अभ्यासेतर उपक्रम म्हणून पहिले जातात. परंतु हे कलाप्रकार आपल्या मुख्य शिक्षणाचा भाग असणं का महत्वाचं आहे हा विचार वैभव सरांनी या भागातून मांडला आहे.
संवादक
सुनीला गोंधळेकर
भाषातज्ञ आणि कथाकार
शिक्षण आणि भाषा
भाषा शिकणे ही प्रक्रिया लहानपणापासूनच आपल्या नकळत सुरु झालेली असते. ही अत्यंत मजेदार आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे. मूल जेवढ्या नवीन भाषा शिकते तेवढा त्याच्या विचारांचा परीघ मोठा होत जातो. ह्या भाषाशिक्षणाच्या प्रक्रियेविषयी सुनीला ताई नी आपलं मत मांडलं आहे.