top of page
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
Anchor 1
teachers with sketch.jpg
teachers1.png

शिक्षक प्रशिक्षण

   मुलांबरोबर सर्वात जास्त काळ शिक्षक काम करत असतात. मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये जे बदल आणण्याचा स्वार्क प्रयत्न करत आहे त्यात शिक्षकांची भूमिका खूप मोठी आहे. त्यामुळे शिक्षकांशी संवाद साधत, त्यांच्या अडचणी समजून घेत त्यांना मदत करण्याचा प्रयत्न या कार्यशाळांमधून होतो. प्रत्येक मुलाच्या पार्श्वभूमीचा विचार करून अभ्यासक्रमाची रचना कशी करावी? शिकण्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमांचा वापर कसा करता येतो? मुलाचं मूल्यमापन कसं करावं? मुलांना स्वतःहून शिकण्याच्या संधी कशा निर्माण कराव्यात? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे चर्चेतून शोधण्याचा प्रयत्न होतो. शिक्षक आणि मुलं यांचातला संवाद अधिक मोकळेपणाने व्हावा, मुलांनी अधिक प्रश्न विचारावेत, मुलांना योग्य तिथे मोकळीक आणि योग्य तिथे शिस्त याचा ताळमेळ राखला जावा यासारखे अनेक उद्देश यातून साधले जातात. शिक्षकांना मुलांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोचण्यासाठी मदत करणं, हा मूळ हेतू या कार्यशाळांमधून पूर्ण होतो. 

ज्ञानज्योती विद्यामंदिर, पुणे

‘ज्ञानज्योती विद्यामंदिर, पुणे’ या शाळेतील शिक्षकांबरोबर जुलै २०२० पासून स्वार्क काम करत आहे. आठवड्यातून दोनदा शिक्षक आणि स्वार्कचे ताई दादा भेटतात. हया कार्यशाळेचा मुख्य हेतू हा शिक्षकांना अभ्यासक्रमाची रचना करण्यात मदत करणे हा आहे. त्यामुळे संकल्पनेची मांडणी, त्यासाठी लागणारी वातावरण निर्मिती, साधनं, उपक्रमांची काठीण्यपातळी याबाबतीत पाहिल्या टप्प्यामध्ये काम झालं. शिक्षकांनी विविध उपक्रम करून बघितले आणि त्यातून अनेक नवीन गोष्टी, माध्यमं त्यांना सापडत गेली. एका संकल्पनेतून दुसरी संकल्पना अश्याप्रकारे संकल्पनांमधील संलग्नता देखील समजून घेता आली. अभ्यासक्रमावरील हे काम चालू असताना शिक्षणाशी निगडीत काही विचारवंतांची ओळख शिक्षकांनी करून घेतली. जीन पियाजे, लिव वाइगोत्स्की यांनी मांडलेल्या तत्वांचा अभ्यास केला. मुलांच्या शिकण्याचा प्रक्रियेतील टप्पे शिक्षकांनी समजून घेतले. ह्या तत्वांचा शिकवण्यामध्ये कसा वापर करावा हे समजून घेण्यासाठी काही उपक्रम शिक्षकांनी करून पहिले. कार्यशाळेच्या तिसऱ्या टप्प्यात शिक्षकांनी ‘तोत्तोचान’ या पुस्तकाचं वाचन केलं. या पुस्तकात एका जपानी शाळेत शिकणाऱ्या तोत्तोचानची गोष्ट सांगितली आहे. ‘तोमोई’ या प्रयोगशील शाळेमध्ये ती शिकत असते. शिक्षकांनी या शाळेत होणारे प्रयोग जाणून घेतले आणि आपल्या शाळेत काय बदल करता येतील याविषयी चर्चा केली. इथून पुढच्या टप्प्यात वर्गातील वातावरण निर्मिती, मूल्यमापन यांसारख्या विषयांबाबतीत काम करणार आहोत.                    

1_a.png
Dnyanjyoti
QEP

QEP (Quality Enhancement Programme)

नवीन शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) ने नेमून दिलेल्या मार्गदर्शिकेप्रमाणे QEP (Quality Enhancement Project) हा वर्षभराचा प्रकल्प तयार केला आहे. ज्यामध्ये पहिली ते तिसरीच्या शिक्षकांचे कार्यशाळा तसेच प्रात्यक्षिके यांच्या माध्यमातून पायाभूत साक्षरता आणि अंकज्ञानाचे टप्पे, विविध श्रेणीतील मुलांबरोबर काम करताना येणाऱ्या अडचणी, मूल्यमापन यांसारख्या संकल्पनांचे दृढीकरण केले जाईल. हा प्रकल्प पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये राबवला जाईल.

Donation Form Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfAPm1mBC9UwOgn85m2m3d2H7Hq5T2MfuApkhS-rgILXWPtQQ/viewform?usp=sf_link 

bottom of page