
स्व -अर्क शोधक

चैत्राली रहाळकर - सिन्नरकर
चैत्रालीने संस्कृत मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ग्राममंगल लर्निंग होम येथे ८ वर्षे मुलांबरोबर काम करण्याचा अनुभव तिला आहे. तसेच विविध ठिकाणी ‘ज्ञानरचनावादातून शिक्षण’, ‘शिक्षकांचा ज्ञानरचनावादी दृष्टीकोन’ यासारख्या विषयांवरती व्याख्याने दिली आहेत. हा अनुभव घेऊन ती स्वार्क मध्ये प्रामुख्याने कार्यशाळा, वार्षिक उपक्रम आणि मुलांसाठीचे शैक्षणिक खेळ यासाठीचे आशय लेखनाचे (content writing) आणि प्रशिक्षणाचे (facilitation) काम करते. त्याचबरोबर ती शिक्षक आणि पालक यांचे प्रशिक्षण वर्ग देखील घेते.

अद्वैत रहाळकर
अद्वैतने वाणिज्य शाखेतून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. याच बरोबर त्याला नाटकाची आवड असल्याने त्याने एकांकिकांचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. तसेच त्याने लहान मुलांसाठी नाटकाच्या कार्यशाळा देखील घेतल्या आहेत. त्यामुळे स्वार्कच्या वेगवगळ्या सादरीकरणांमध्ये तो सादरकर्ता, कार्यशाळा आणि वार्षिक प्रकल्पांमध्ये आशय लेखक तसेच प्रशिक्षक म्हणून काम करतो. त्याचप्रमाणे स्वार्कची आर्थिक आणि व्यवस्थापनाची बाजूही सांभाळतो.


नेहल पिंपळखरे
नेहल नैदानिक मानसशास्त्रज्ञ (Clinical Psychologist) आहे. तिने नैदानिक मानसशास्त्रात M.Phil. केले आहे. लहान आणि पौगंडावस्थेतील मुलांच्या मानसिक स्वस्थ्याबाबत गेली ४ वर्षे ती काम करत आहे. याचबरोबर तिला भरतनाट्यम आणि नाटक या कलांचा अनुभव आहे. हा अनुभव घेऊन ती स्वार्कमध्ये मुलांच्या मानसिकतेचा अभ्यास व विश्लेषण करून शैक्षणिक साधने आणि खेळ तयार करण्यासाठी, तसेच कार्याशाळांसाठी काम करते तसेच ती आशय लेखक आणि प्रशिक्षक देखील आहे.

यश पाडळकर
यश हा चित्रकार, शिल्पकार आहे. खडूमधील कोरीव काम करण्यात त्याने विशेष नैपुण्य कमावले आहे. त्याच्या या कल्पकतेचा स्वार्कला शैक्षणिक साधने आणि खेळ यांच्या रचनेसाठी उपयोग होतो. त्याचबरोबर कार्यशाळा आणि वार्षिक उपक्रमांमध्ये मुलांसाठी वातावरण निर्मिती करण्यासाठी जागेची रचना देखील तो करतो. तसेच कार्यशाळांमध्ये प्रशिक्षक म्हणून आणि स्वार्कचा आर्थिक व्यवस्थापक म्हणून देखील काम करतो.



नचिकेत थत्ते
नचिकेत ने वाणिज्य शाखेतून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. वेगवेगळ्या नाटकांचा आणि लघुपटांचा व्यवस्थापक आणि कला दिग्दर्शक म्हणून त्याने काम केले आहे. खेळाविषयी त्याला विशेष आवड आहे. स्वार्कचा व्यवस्थापक आणि तंत्रज्ञ म्हणून तो काम पाहतो. त्याचप्रमाणे कार्यशाळांमध्ये प्रशिक्षक म्हणून देखील काम करतो.

स्पृहा कुलकर्णी
स्पृहा ही भरतनाट्यम नृत्यांगना आहे. तिने गांधर्व महाविद्यालयातून नृत्य अलंकार ही पदवी संपादन केली आहे आणि भारती विद्यापीठातून भरतनाट्यम मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. तिने वेगवेगळ्या नृत्य आणि नाट्य उत्सवांमध्ये सादरीकरण केले आहे. नृत्य हे शिकण्याचे माध्यम म्हणून कसे वापरता येईल याविषयी ती स्वार्क मध्ये काम करते. स्वतः एक नृत्य दिग्दर्शक असल्याने स्वार्क च्या विविध सादरीकारणांमध्ये ती दिग्दर्शक आणि सादरकर्ती म्हणून काम करते.