

सादरीकरण
शाळेतील अभ्यासक्रमाबरोबरच कलांचा अनुभव घेणं हा सुद्धा शिकण्याचा भाग आहे. मुलं जेवढ्या कलांचा अनुभव घेतात तेवढे त्यांचे विचार प्रगल्भ होत जातात. नाटक, नृत्य, संगीत, कथाकथन या कलांमधून संवेदनशीलपणा, सर्जनशीलता,सृजनशीलता, सौंदर्यदृष्टी, empathy, रसनिष्पत्ती यांसारख्या वैयक्तिक वैशिष्ट्यांचा विकास साधता येतो. मुलं खूप सहजपणे या कलांशी जोडून घेऊ शकतात. मुलं जे पाहतात त्यातून त्याचं भावविश्व तयार होत असतं. त्यामुळे वेगवगळ्या कलाकृतींमधून मुलाचं मनोरंजन करत मुलाचं भावविश्व अधिक रंगतदार करण्याकडे स्वार्कचा कल आहे.
गोष्टबिष्ट (ऑक्टोबर २०१९)
‘बालरंजन केंद्र, पुणे’ येथे ऑक्टोबर २०१९ मध्ये ‘गोष्टबिष्ट’ हा कार्यक्रम ‘स्वार्क’ने सादर केला. मुलं लहानपणापासून गोष्टी ऐकत असतात, सांगत असतात. वेगवेगळ्या माध्यमातून गोष्ट ऐकलायला मुलांना खूप आवडतं. यावेळी दोन गोष्टी मुलांसमोर सादर केल्या गेल्या. एक नाट्यवाचन स्वरूपात आणि दुसरी गाणं आणि नाटक या स्वरूपात. मधे मधे ताई दादा मुलांशी संवाद साधत होते. या दोन्ही गोष्टींसाठी live music चा वापर केला गेला. त्यातून नवीन वाद्य मुलांना ऐकायला मिळाली. मुलांसमोर सादरीकरण करताना गोष्टींची निवड, सदरीकारणासाठी वापरली जाणारी माध्यमं, गोष्ट संगाण्यामधील नाविन्य, मुलांना सहभागी करून घेणं या बाबींचा विचार केला गेला.