

‘स्वार्क’
प्रत्येक माणूस हा वेगळा आहे. ‘हे वेगळेपण नक्की काय आहे?’ याबद्दलचं कुतूहल कायमच माणसाला स्वतःच्या आत खोलवर बघायला लावतं. हा स्वतःनी स्वतःभोवती आणि स्वतःशी केलेला संवाद हळूहळू या कुतूहलाचा एकेक पदर सोडवत जातो. हा संवाद नवनवे आयाम, अनुभव, दिशा, आशय स्वतःभोवती लपेटून आपल्याला एका अश्या जागी नेऊन पोहोचवतो जिथे स्वतःविषयीचं एक नवं सत्य उमगतं, हाच
स्वतःच्या मुळातून गवसलेला अर्क अर्थात ‘स्वार्क’.

उद्दिष्टे
प्रत्येक मुलासाठी शिकणं ही आनंददायी, कलात्मक आणि स्व शोधाची संधी देणारी अशी सहज प्रक्रिया व्हावी.
मुलांचा पूर्णतः स्वीकार
प्रत्येक मूल वेगळं आहे कारण ते वेगळ्या सामाजिक, भावनिक आणि आर्थिक पार्श्वभूमीतून येतं. त्यामुळे प्रत्येकाला शिकण्यासाठी त्याला अनुकूल असं वातावरण, माध्यम, पद्धत, संधी निर्माण करणं गरजेचं आहे.
स्वार्कची तत्वे
अनुभव
शिकण्यामध्ये निरनिराळे कलाप्रकार , अनुभव, आणि प्रत्यक्ष करून बघणं याचा समावेश केल्याने संकल्पना दृढ होतात आणि मुलांच्या विचारांचा आवाका मोठा होण्यास मदत होते.
शिकवण्यापेक्षा शिकणं
शिकणे ही नैसर्गिक क्रिया आहे. त्यामुळे शिकवण्यापेक्षा मुलांना स्वतःहून शिकण्याची संधी निर्माण करणं जास्त महत्वाचं आहे.


